Lalparibus.com

एसटी बस वेळापत्रक (MSRTC)

तुमच्या एसटी (लालपरी) बसची वेळ शोधा. बस स्थानकाचे नाव किंवा कुठे जायचे ते लिहा.

  1. 1बस स्थानक किंवा "कुठून ते कुठे" लिहा
  2. 2हवा तो निकाल दाबा
  3. 3पहिली, शेवटची बस आणि सर्व वेळा पहा

लोकप्रिय बस स्थानके

लोकप्रिय मार्ग

हे संकेतस्थळ का?

लालपरीच्या वेळा बहुतेक वेळा बस स्थानकावर लावलेल्या कागदावर असतात, किंवा मोबाईलवर वाचायला कठीण अशा फोटोत. आम्ही त्या बस स्थानकानुसार टाइप करून ठेवल्या आहेत, म्हणजे तुम्हाला घरबसल्या पाहता येतील. अ‍ॅप नको, साइन-अप नको. एसटी बस स्थानकांवर लावलेलेच वेळापत्रक, फक्त वाचायला सोपे.

सध्या 32 जिल्ह्यांतील 245 बस स्थानकांच्या वेळा येथे आहेत. वेळ चुकीची दिसली तर कृपया आम्हाला कळवा.

जिल्ह्यानुसार बस स्थानके

सर्व बस स्थानके

लोक नेहमी विचारतात

बसची वेळ कशी शोधायची?

वर असलेल्या बॉक्समध्ये तुमचे बस स्थानक किंवा "चंद्रपूर ते नागपूर" असे लिहा. निकाल दाबा, म्हणजे पहिली बस, शेवटची बस आणि मधल्या सर्व वेळा दिसतील.

एसटीचा हेल्पलाईन नंबर कोणता?

एसटीचा टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 1800 22 1250 आहे.

लालपरी म्हणजे काय?

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) लाल रंगाच्या बसेसना लोक प्रेमाने लालपरी म्हणतात.

या वेळा नेहमी बरोबर असतात का?

या वेळा एसटी बस स्थानकांवर लावलेल्या वेळापत्रकातून घेतल्या आहेत. सण, पावसाळा यामुळे वेळा अधूनमधून बदलतात, म्हणून प्रवासापूर्वी बस स्थानकावर खात्री करा.

Lalparibus.com इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करण्यासाठी ब्राउझरच्या मेनूमध्ये "Install app" किंवा "Add to Home screen" निवडा. आयफोनवर Share बटण दाबून "Add to Home Screen" निवडा.